हरवत चाललेली माळरानं आणि निसर्गाची लोकडायरी
पश्चिम वऱ्हाडातील बदलत्या पर्यावरणाची नोंद मे महिन्याचा उष्मा वाढू लागला की पश्चिम वऱ्हाडातील ग्रामीण परिसरात एक वेगळंच दृश्य दिसू लागतं. शेतातील धुरे पेटवले जातात, बांधांवरील गवत आणि झुडपे जाळली जातात, तर नाल्या आणि नदीकाठच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर छाटणी केली जाते. अनेक ठिकाणी झाडं अक्षरशः बुटकी करून टाकली जातात. ही प्रक्रिया इतकी सामान्य झाली आहे की …